शाहरूख खान : बॉलीवूड मधला काशिनाथ घाणेकर

 परवा टि.व्ही.वर अशोक सराफांच्या  संपूर्ण कारकिर्दीची दखल घेणारा कार्यक्रम बघितला- 'सम्राट अशोक' . बरं वाटलं बघून. त्या कार्यक्रमानंतर मी आणि माझा एक चित्रपट समीक्षक मित्र गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा लगेच तो म्हणाला, " एक नंबर यार, अशोक सराफ ! सर्वगुणसंपन्न अभिनेता, मराठीतला अमिताभ बच्चन !" तिथून खरा हा विषय सुरू झाला...

माझ्या मनात विचार आला, म्हटलं दर वेळी काय हे लोक मराठी कलाकारांना  बॉलीवूड च्या  कलाकारांची नावं  देत असतात ? मराठीतला देव आनंद (सुनील बर्वे), मराठीतला अमिताभ (अशोक सराफ), मराठीतला सलमान खान (सचित पाटिल, हे नाव नुकतंच कळालं मला, एका कार्यक्रमात) ? हिंदी चित्रपटातील शाहरुख खानची आई (नीना कुळकर्णी), हिंदी चित्रपटातील सलमान खानची आई (रीमा लागू), हिंदी चित्रपटातील अमुक नटिचा  भाऊ  किंवा बहिण, वगैरे, वगैरे. बरीच लांबलचक यादी देता येईल. 

एक वेळ हिंदी मिडियाने असं केलं तर आपण समजू शकतो. कारण या सगळ्या मराठी अभिनेत्यांचा अभिनय त्यांनी फक्त हिंदी चित्रपटांमध्ये पाहिलेला असतो. तो ही दुय्यम दर्जाच्या भूमिकेत. पण मराठी मिडियाला कळायला नकोत का या गोष्टी ? मराठी मिडियाला गरज काय मराठी अभिनेत्यांची अशा प्रकारे ओळख करून देण्याची ? मराठी प्रेक्षक कित्येक वर्षांपासून या अभिनेत्यांचा अभिनय मराठी चित्रपट-नाटक-मालिकांच्या मधूनप्रमुख भूमिकांमधून बघत आलेला आहे. त्यामुळे या कलाकारांच्या मराठीत गाजलेल्या भूमिकांविषयीची ओळख सांगायचं सोडून हे काय भलतंच ? मराठी अभिनेत्यांना स्वतंत्र अशी ओळख आहे कि नाही ?

                         एकीकडे मराठी चित्रपटसृष्टीला सोन्याचे दिवस आणण्यासाठी मराठी इंडस्ट्रितले लोक धडपडतायत आणि दुसरीकडे त्यांच्यातलेच काही लोक अशा प्रकारे ( नकळत का होईना ) मराठी नटांची ओळखच झाकून टाकतायत.  मान्य आहे कि कदाचित फक्त असं 'नावं देण्याने' फारसा फरक पडत नसेलही कलाकारांवर. पण एक मराठी चित्रपट रसिक म्हणून, एक प्रेक्षक म्हणून  माझ्या सारख्या लोकांना नसतील आवडत असल्या गोष्टी, तर याचा काही विचार  कराल कि नाही ?  आणि दर वेळी जर मराठी नटांना  दुसर्‍या कुणाची तरी नावं आपण देत बसलो आणि त्याच नावाने त्यांना ओळखायला लागलो, तर मग त्यांचं 'ब्रँडिंग' होणार तरी कसं ? पब्लिक मध्ये स्वतःची वेगळी 'क्रेझ' कशी काय निर्माण करणार ते लोक ? त्यांच्या नावावर सिनेमे चालणार कसे ? त्यांना पण एक 'स्पेस' देणं आवश्यक आहे कि नाही ?

आता मला काही इथे बॉलीवूडच्या नट-नट्यांचा तिरस्कार वगैरे करायचा नाही. २००० सालच्या आधीच्या सगळ्या बॉलीवूड फिल्म्स् चा मी निस्सिम चाहता आहे. आणि बॉलीवूड मध्येही असे अनेक दिग्गज कलाकार आहेत ज्यांना हॉलीवूडच्या कलाकारांची नावं दिली आहेत, उदा. देव आनंदला बॉलीवूडचा 'ग्रेगरी पेक' म्हणतात, मिथुन चक्रवर्तीला तर 'गरिबांचा अमिताभ बच्चन' वगैरे म्हणतात. असो. ते वेगळं.

                                   तर इथे मुद्दा मराठी कलाकारांच्या ईमेज चा आहे. माझ्या त्या मराठी मिडियातल्या अति-आगाऊ मित्राने मराठी कलाकारांवर केलेली कमेंट मला अजिबात आवडली नाही. म्हणून मग मी असं ठरवलंय कि, जर मराठी कलाकारांना बॉलीवूडच्या कलाकारांच्या नावाने ओळखणार असाल, तर मग आम्ही पण बॉलीवूड मधल्या कलाकारांना मराठी कलाकारांच्या नावाने ओळखणार. बस्स.  आणि  म्हणून मग मी काही सम-समान व्यक्तिमत्त्वाच्या लोकांची नावं बॉलीवूडकर मंडळींना दिली आहेत. अजून काही नवीन नावं सुचली तर ती पण टाकीन इथे.

तर हि नावांची यादी :-

 तळ  टीप :- मराठी आणि हिंदी चित्रपटांचे जे खरे चाहते आहेत, त्यांना वरील कलाकारांच्यात असलेलं साम्य लगेचच लक्षात येईल.
To Read Original Article Click Here